Mumbai, जानेवारी 25 -- Padma Awardees from Maharashtra List : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आज पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक पद्म पुरस्कार हे पद्म विभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या तीन श्रेणींमध्ये दिले जातात. यंदासात जणांना पद्मविभूषण पुरस्कार, १९ जणांना पद्मविभूषणआणि ११३ जणांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्रात देखील विविध क्षेत्रात मोठं काम करणाऱ्या १४ जणांना पद्म पुरस्कार मिळाल्याची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये ३ पद्मभूषण तर ११ जणांना पद्मश्री पुरस्कार दिला आहे.

आज जाहीर झालेल्या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर जोशी यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला आहे. प्रसिद्ध होमिओपॅथिक डॉ. विलास डांगरे यांना पद्मश्री पुरस्कार, तसेच प्...