Mumbai, जानेवारी 28 -- OTT Release This Week : सध्या ओटीटीवर मनोरंजनाचा खजिना निर्माण झाला आहे. दर आठवड्याला वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर वेगवेगळे चित्रपट आणि वेब सीरिज रिलीज होत असतात. या आठवड्यात देखील प्रेक्षकांना असाच मनोरंजनाचा खजिना पाहायला मिळणार आहे. या आठवड्यात म्हणजे २७ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान अनेक धमाकेदार चित्रपट आणि सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यावेळी प्रेक्षकांना घरीच बसून काही जबरदस्त कंटेंट बघण्याची संधी मिळणार आहे. पाहा या आठवड्यात रिलीज होणाऱ्या चित्रपट आणि वेब सीरिजची यादी...

राष्ट्रीय आणि अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर, अभिनेता परेश रावलचा चित्रपट 'द स्टोरी टेलर' ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर आज म्हणजेच २८ ज...