भारत, नोव्हेंबर 30 -- Operation London Cafe: साऊथच्या ॲक्शन चित्रपटांचा सध्या जगभरात बोलबाला आहे. या चित्रपटांनी रसिक प्रेक्षकांना देखील भुरळ घातली आहे. मराठीत देखील आता साऊथ स्टाईल ॲक्शन चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. याच धर्तीवर आता एक असाच साऊथ स्टाईल पॅन इंडिया मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ॲक्शनचा तडका दिसणार आहे. या चित्रपटातील मुख्य अभिनेता विराट मडके याचा लूक नुकताच रिलीज करण्यात आला आहे.

निर्माते दिपक पांडुरंग राणे ही या आगामी पॅन इंडिया चित्रपटाची निर्मिती करत आहेत. या चित्रपटाचे नवीन पोस्टर नुकतेच समोर आले आहे. या चित्रपटात अभिनेता विराट मडके एका वेगळ्या रावडी लूकमध्ये दिसणार आहे. आत्तापर्यंत विराटने साकारलेल्या भूमिकेपेक्षा एकदम विरोधाभास असणारी भूमिका आणि त्याप्रमाणे त्यातला ह...