Mumbai, एप्रिल 15 -- OnePlus 11 price drops again in India: वनप्लसने आपला प्रीमियम स्मार्टफोन वनप्लस ११ च्या किंमतीत आणखी घट करून भारतीय ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे. एवढेच नव्हेतर, या स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना आकर्षक अशी बँक ऑफर मिळत आहे. वनप्सल ११ च्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरज असलेल्या व्हेरिएंटच्या खरेदीवर ग्राहक आणखी पैशांची बचत करू शकतात. या व्हेरिएंटमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८ जेन २ चिपसेट देण्यात आला असून यात १०० वॅट फास्ट चार्जिंग क्षमतेसह ५ हजार एमएएच क्षमता असलेली बॅटरी देण्यात आली.

वनप्लस ११ च्या ८ जीबी रॅम व्हेरियंटच्या किंमतीत सातत्याने घसरण होत आहे. सुरुवातील या स्मार्टफोनच्या मूळ किंमतीत दोन हजार रुपयांची कपात करण्यात आली होती. यानंतर आता आणखी तीन हजार रुपयांची कपात केली आहे. यामुळे ग्राहक...