Mumbai, जानेवारी 31 -- Jobs 2025: नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन ने इंजिनीअरिंग एक्झिक्युटिव्ह ट्रेनी पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एनटीसीपीच्या अधिकृत वेबसाइटवर जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, एनटीपीसीच्या या भरतीमध्ये एकूण ४७५ कार्यकारी प्रशिक्षणार्थी अभियंत्यांची नियुक्ती केली जाईल. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार १३ फेब्रुवारी २०२५ पर्यंत www.ntpc.co.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. एनटीपीसीच्या म्हणण्यानुसार, उमेदवारांची नियुक्ती गेट स्कोअर २०२४ द्वारे केली जाईल.

एनटीपीसीच्या या रिक्त जागेत एकूण ४७५ प्रशिक्षणार्थी अभियांत्रिकीची नियुक्ती केली जाईल. यामध्ये इलेक्ट्रिकल इंजिनीअरच्या १३५, मेकॅनिकल इंजिनीअरिंगच्या १८० पदे, इलेक्ट्रॉनिक्सच्या ८५ पदे, सिव्हिल इंजिनीअरिंगच्या ५० जागा, मायनिंग इ...