Mumbai, एप्रिल 29 -- NPS Revises Charges : नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) योजनेअंतर्गत खाते उघडण्याची सुविधा देणाऱ्या केंद्रांची (POPs) शुल्क रचना पेन्शन फंड नियामक प्राधिकरणानं बदलली आहे. या केंद्रांद्वारे प्रदान करण्यात येणाऱ्या विविध सुविधांसाठी आता किमान आणि कमाल शुल्क निश्चित करण्यात आलं आहे.

याआधी ही केंद्रे व एनपीएस खातेदार आपसात घासाघीस घासाघीस करून शुल्क ठरवत असत. मात्र, आता पीएफआरडीएनं शुल्कातील बदलांचं परिपत्रक जारी केलं आहे. एनपीएस खातं उघडणं आणि ते ऑपरेट करणं सोपं व्हावं म्हणून त्याची जबाबदारी पॉइंट ऑफ प्रेझेन्स (POP) वर देण्यात आली आहे. हे पीओपी पीएफआरडीए स्वतः निवडते. पीओपीचे जाळं मोठं आहे. पीओपी हा ग्राहक आणि एनपीएसमधील महत्त्वाचा दुवा असतो. ही केंद्रे ग्राहकांना सेवा देण्यासाठी काही शुल्क आकारतात.

Business Ideas : थेंबे थेंबे...