Mumbai, जानेवारी 24 -- सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोव्हाक जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपन २०२५ मधून बाहेर पडला आहे. जोकोविचने दुखापतीमुळे अलेक्झांडर झ्वेरेव्ह (जर्मनी) विरुद्धचा उपांत्य सामना अर्ध्यावर सोडला.

झ्वेरेव्हने पहिला सेट ७-६ (५) असा जिंकला, त्यानंतर जोकोविचने सामन्यातून माघार घेतली. यामुळे जर्मन खेळाडूला वॉकओव्हर मिळाला. यानंतर आता अंतिम फेरीत झ्वेरेव याचा सामना यानिक सिनर (इटली) आणि बेन शेल्टन (यूएसए) यांच्यातील दुसऱ्या उपांत्य फेरीतील विजेत्याशी होईल.

जोकोविच आणि माजी ऑस्ट्रेलियन दिग्गज मार्गारेट कोर्ट सर्वाधिक एकेरीत ग्रँड स्लॅम विजेतेपदे (महिला आणि पुरुष) जिंकण्याच्या बाबतीत बरोबरीत आहेत. या दोघांनी एकेरीचे २४ ग्रँडस्लॅम एकेरी जेतेपदे जिंकली आहेत.

Novak Djokovic : जोकोचविचची संघर्षकथा, एकेकाळी दूध-ब्रेडसाठी रांगेत उभं राहायचा, आज स...