Mumbai, फेब्रुवारी 19 -- Congress questions Devendra Fadnavis : 'माझा बॉस 'सागर' बंगल्यावर बसला आहे, पोलीस माझं काहीच वाकडं करू शकत नाहीत, असं थेट आव्हान भाजपचे आमदार नीतेश राणे देतात. त्यांच्यावर कारवाई का होत नाही? ती हिम्मत नसेल तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसनं केली आहे.

राज्यात भाजपचं सरकार आल्यापासून आमदार नीतेश राणे हे वेगवेगळ्या ठिकाणी भाषणं देताना चिथावणीखोर भाषा वापरत आहेत. पोलीसही आपलं काही बिघडवू शकत नाहीत असं म्हणत आहेत. त्यावर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी संताप व्यक्त केला आहे.

'कटकारस्थान करून महाविकास आघाडीचं सरकार पाडून सत्तेत आलेल्या असंवैधानिक खोके सरकारच्या काळात सत्ताधारी आमदार, खासदारांची गुंडगिरी वाढली आहे. भाजपचा आमदार नितेश राणे राजरोसपणे धमक्या देत आहे, ...