भारत, फेब्रुवारी 1 -- Nirmala Sitharaman Saree on Budget Day: अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. केंद्रीय अर्थसंकल्पाच्या दिवशी त्यांच्या पेहरावाची खूप चर्चा असते. निर्मला सीतारामन यांची साडी आतापर्यंत ७ वेळा अर्थसंकल्पाच्या दिवशी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. यंदाही अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पाच्या दिवशी खास प्रकारची साडी नेसली आहे, जिने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग आठव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. आतापर्यंत कोणत्याही अर्थमंत्र्यांनी इतक्या वेळा अर्थसंकल्प सादर केला नाही. आज सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. याआधी निर्मला सीतारामन यांनी आपल्या संपूर्ण बजेट टीमसोबत औपचारिक फोटोसेशन केले. यावेळी निर्मला सीतारामन यांनी पारंपारिक क्रीम रंगाची मधुबनी मो...