भारत, नोव्हेंबर 25 -- फिफा विश्वचषक स्पर्धेत ब्राझीलने सर्बियाचा २-० असा पराभव करून आपल्या मोहिमेला धमाकेदार सुरुवात केली. ब्राझीलचे दोन्ही गोल रिचार्लिसनने केले. २४ नोव्हेंबर रोजी झालेल्या या सामन्यातील विजयासोबतच ब्राझील संघासाठी एक चिंताजनक बातमीही समोर आली आहे. सामन्याच्या शेवटच्या मिनिटांमध्ये संघाचा स्टार खेळाडू नेमार ज्युनियर दुखापतग्रस्त झाला. त्याच्या उजव्या पायाच्या घोट्याला दुखापत झाली. त्यामुळे त्याला मैदानदेखील सोडावे लागले. आता स्वित्झर्लंडविरुद्धच्या सामन्यात नेमारचे खेळणे साशंक आहे.

नेमारच्या दुखापतीबाबत ब्राझील संघाचे फिजीओ रॉड्रिगो लस्मार यांनी माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, "नेमारच्या उजव्या घोट्याला मोच आली आहे. मात्र, सोमवारी स्वित्झर्लंडविरुद्ध होणाऱ्या संघाच्या पुढील सामन्यात खेळण्यासाठी तो उपलब्ध असेल की ना...