Mumbai, फेब्रुवारी 14 -- New India Co-operative Bank : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर अनेक निर्बंध घातले होते. गुरुवारी, १३ फेब्रुवारी २०२५ रोजी बँकेचे कामकाज बंद झाल्यानंतर हे निर्बंध सहा महिन्यांच्या कालावधीसाठी कायम राहतील, ज्याचा आढावा घेतला जाईल. यामुळे मुंबईयेथीलन्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या बाहेर शुक्रवारी लोकांच्या रांगा लागल्याचे पाहायला मिळाले. आरबीआयकडून पैसे काढण्यावर निर्बंध लागू केल्यानंतर आपल्या पैशाच्या चिंतेने लोकांनी पैसे काढण्यासाठी बँकेसमोर झुंबड उडाली. भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) ने गुरुवारी बँकेवर अनेक प्रकारचे निर्बंध घातले होते.

रिझर्व्ह बँकेच्या कारवाईनंतरमुंबईतील अंधेरी येथील विजयनगर शाखेच्या बाहेर शुक्रवारी खाताधारकांनी गर्दी केली होती. ग्राहकांमध्ये संभ्रमावस्था आहे की, ...