Delhi, फेब्रुवारी 4 -- New Income Tax Act : प्राप्तिकर व कर वसूलीशी संबंधित प्रक्रिया सरकार अधिक पारदर्शक आणि सोपी करणार आहे. नवा प्राप्तिकर कायदा आंतरराष्ट्रीय दर्जा व मानकांनुसार राहणार आहे. या साठी सरकार सुधारित (नवीन) प्राप्तिकर विधेयक गुरुवारी संसदेत मांडण्याची शक्यता आहे. या नव्या कायद्याद्वारे सरकार आयकर कायद्याशी संबंधित अनावश्यक तरतुदी काढून टाकणार आहेत व ही प्रक्रिया आणखी सोपी करणार आहेत.

प्राप्तिकर व आयकर वसलूशी संबंधित कायदे आणखी सोपे केले जाणार आहेत. करदाते आणि अधिकाऱ्यांना समजेल अशा पद्धतीने याची रचना केली जाणार आहे. सर्व तरतुदी काढून टाकल्या जातील, त्यामुळे प्राप्तिकर विभागावरील खटल्यांचा बोजा वाढणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी लोकसभेत सादर केलेल्या अर्थसंकल्पादरम्यान सांगितले की, सरकार पुढील आठवड्यात नव...