New delhi, फेब्रुवारी 20 -- Neet UG : परदेशातून एमबीबीएस करण्यासाठी नीट यूजी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाचा हा नियम सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. केंद्र सरकारने २०१८ मध्ये लागू केलेल्या या नियमामुळे परदेशात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना भारतात वैद्यकीय प्रॅक्टिस करण्यासाठी आवश्यक मानकांची पूर्तता करता येईल. हे नियम निष्पक्ष, पारदर्शक असून कोणत्याही वैधानिक तरतुदी किंवा राज्यघटनेच्या विरोधात नाहीत, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. हा नियम इंडियन मेडिकल कौन्सिल अॅक्ट १९५६ मधील कोणत्याही तरतुदीच्या विरोधात नाही किंवा कोणत्याही प्रकारे मनमानी किंवा अवाजवी नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.

नीट यूजी उत्तीर्ण होणे हे पदवीधर वैद्यकीय शिक्षण नियम, १९९७ मध्ये निर्धारित पात्रतेच्या निकषां...