भारत, फेब्रुवारी 7 -- Sharad Pawar Faction letter to ECI : राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष व त्याचं घड्याळ हे चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगानं अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला बहाल केल्यानंतर शरद पवार गटानं आता आपल्या पक्षासाठी तीन नावांचे पर्याय निवडणूक आयोगाकडं पाठवले आहेत. निवडणूक आयोग आता यावर काय भूमिका घेतो याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

शरद पवार यांनी १९९९ साली स्थापन केलेला राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात काही महिन्यांपूर्वी उभी फूट पडली. अजित पवार हे पक्षातील बहुतेक आमदार घेऊन बाहेर पडले आणि त्यांचा गट भाजपच्या सरकारमध्ये सहभागी झाला. त्यानंतर त्यांनी पक्षाचं नाव आणि चिन्हावर दावा केला. निवडणूक आयोगानं त्यावर सुनावणी घेऊन नुकताच निकाल दिला. लोकप्रतिनिधींच्या संख्येच्या बळावर निवडणूक आयोगानं पक्ष आणि पक्ष चिन्ह अजित पवार गटालं दिल...