Mumbai, फेब्रुवारी 14 -- NCP Congress merger News : 'शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी पक्षाचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार असल्याची चर्चा आमदार शशिकांत शिंदे यांनी फेटाळून लावली आहे. ही केवळ अफवा आहे आणि ती कुणी पसरवली याचा शोध पत्रकारांनी घ्यावा,' असं त्यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस हा मूळ पक्ष व त्या पक्षाचं घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाला देण्यात आल्यामुळं शरद पवार यांच्या पक्षापुढं सध्या अनेक आव्हानं आहेत. आगामी निवडणुकांना कोणत्या चिन्हावर सामोरं जायचं हा प्रश्न आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर पुण्यात आज पक्षाचे आमदार, खासदार व नेत्यांची बैठक होत आहे.

Sharad Pawar : शरद पवार मोठा डाव टाकण्याच्या तयारीत; राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला जाणार असल्याची चर्चा

ही बैठक सुरू होण्याआधीच पवारांचा पक्ष काँग्रेसमध्...