Mumbai, जानेवारी 29 -- Nayanthara Dhanush Documentary Clash : अभिनेता धनुष आणि अभिनेत्री नयनतारा यांच्यातील एक वाद मद्रास उच्च न्यायालयात पोहोचला होता. यात आता धनुषने विजय मिळवला आहे. धनुषने दाखल केलेल्या कॉपीराईट प्रकरणी नेटफ्लिक्स इंडियाची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. धनुषने दावा केला होता की त्याच्या चित्रपटातील ३ सेकंदाची क्लिप नयनताराच्या माहितीपटात परवानगीशिवाय वापरली गेली होती.

धनुषने नोव्हेंबर २०२४मध्ये नयनतारा, तिचा पती विघ्नेश शिवन आणि त्यांचे प्रोडक्शन हाऊस राउडी पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या विरोधात मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली होती. धनुषने नेटफ्लिक्स डॉक्युमेंटरी 'नयनतारा: बियॉन्ड द फेयरी टेल'मध्ये नयनतारा आणि इतरांनी आपली परवानगी न घेता 'नानुम राउडी धान' चित्रपटातील फुटेज वापरल्याचे म्हटले होते.

या क्लिपचा वाप...