नवी मुंबई, फेब्रुवारी 17 -- Navi Mumbai news : नवी मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. राज्यात संतोष देशमुख हत्याकांडावरून रान उठले असता भाजपच्या एका माजी नगरसेवकाने पोलीस ठाण्यातच विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या पूर्वी त्याने व्हिडिओ पोस्ट करून वाल्मीक कराडचे नाव घेत गंभीर आरोप केले आहे. ही घटना रायगडमधील कर्जत पोलीस ठाण्यात घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. भरत जाधव असे या भाजपच्या माजी नगरसेवकांचे नाव असून ते नवी मुंबई महापालिकेचे माजी नगरसेवक आहेत. त्यांना तातडीने दवाखान्यात भरती करण्यात आले आहे.

भरत जाधव यांनी आज रायगड जिल्ह्यातील कर्जत पोलीस ठाण्यात विष प्राशन केलं. जाधव यांनी विष पिण्याच्या आधी एक व्हिडिओ काढला असून त्यात त्यांनी त्यांची फसवणूक झाल्याचं म्हटलं आहे. त्यांनी विष प्यायल्यानंतर पोलिसांची धावपळ...