Navi Mumbai, जानेवारी 29 -- Sion-Panvel Road Accident : मुंबईत आपघातांची मालिका सुरूच आहे. आज सकाळी सायन-पनवेल मार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका रिक्षा चालकाचा मृत्यू झाला आहे. एक भरधाव कार जुईनगर येथील स्थानकासमोर उभ्या असलेल्या दोन रिक्षाला जाऊन धडकली. यात दोन रिक्षासह कारचे मोठे नुकसान झाले आहे. तर मृत रिक्षा चालकाचे नाव घनश्याम यादव यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी पहाटे ६ च्या दरम्यान, सायन-पनवेल मार्गावर असलेल्या जुईनगर येथील बसस्थानकावर दोन रिक्षा या प्रवाशांची वाट पाहत उभ्या होत्या. रिक्षा चालक घनश्याम यादव हे देखील त्यांच्या रिक्षाच्या शेजारी उभे होते. यावेळी एक कार भरधाव वेगात आली आणि त्यांना आणि त्यांच्या रिक्षाला जोरदार धडकली. यात गंभीर जखमी झाल्याने घनश्याम यादव यांचा जागीच...