Mumbai, फेब्रुवारी 13 -- National Women Day 2025 Wishes In Marathi : आज भारतात राष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. दरवर्षी १३ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. मात्र, या दिवसाबाबत अनेकांच्या मनात गोंधळ असतो, की सगळीकडे महिला दिन ८ मार्च रोजी साजरा केला जातो. मग, भारतात १३ फेब्रुवारीला महिला दिन साजरा करण्याचं काय कारण आहे? या दोन दिवसांत एक फरक आहे, तो म्हणजे ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. तर, १३ फेब्रुवारी रोजी भारतात राष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. हा खास दिवस देशाच्या प्रमुख स्वातंत्र्यसैनिक सरोजिनी नायडू यांच्याशी संबंधित आहे. हा दिवस भारताच्या पहिल्या राज्यपाल सरोजिनी नायडू यांचा वाढदिवस आहे. म्हणूनच, सरोजिनी नायडू यांचे योगदान दरवर्षी राष्ट्रीय महिला दिन सा...