नाशिक, फेब्रुवारी 2 -- Nashik Accident : कुंभमेळ्यासाठी रत्नागिरी येथून प्रयागराज येथे गेलेल्या भाविकांच्या ईनोव्हा गाडीला सिन्नर जवळ भीषण अपघात झाला. या अपघात निवृत्त प्राध्यापकासह तिघे जण ठार झाले. तर तिघे जण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर कारचा चक्काचूर झाला होता.

या अपघातात डीएड कॉलेजचे माजी प्राचार्य प्रताप सावंत देसाई, चालक भगवान उर्फ बाबू झगडे व रत्नागिरी येथील हॉटेल व्यवसायिक अक्षय निकम हे ठार झाले आहेत. तर तिघे जण जखमी झाले आहेत. हे सगळे रत्नागिरी खेडशी येथील रहिवासी होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रत्नागिरी येथून ७ जण हे महाकुंभमेळ्यासाठी प्रयागराज येथे गेले होते. हे सर्व जण परतीच्या मार्गावर होते. यावेळी नाशिक येथे त्यांच्या ईनोव्हा कारचा भीषण अपघात झाला. मृत सर्वजण एकमेकांचे नातेवाईक आहेत. जखमी किरण निकम यांची प्रकृती गंभीर...