Mumbai, मार्च 30 -- Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana : राज्यातील शेतकऱ्यांसाठी गुढीपाडव्याच्या निमित्त सरकारने खुशखबर दिली आहे. राज्यातील ९३.२६ लाख शेतकरी कुटुंबाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याचा सुमारे २१६९ कोटींचा निधी आधार व डीबीटी संलग्न सक्रीय बँक खात्यात ३१ मार्च, २०२५ पूर्वी जमा करण्यात येत आहे, अशी माहिती कृषी मंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांनी दिली.

कृषी मंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले की, शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी.एम. किसान) योजना फेब्रुवारी, २०१९ पासून सुरु केली आहे. या योजनेच्या निकषांनुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पती, पत्नी व त्यांची १८ वर्षांखालील अपत्ये) २००० रुपये प्रती हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात प्रती वर्षी ६००० रूपये ...