Baramti, मार्च 2 -- Namo Rojgar melava : मोठी जाहीरातबाजी आणि गाजावाजा करून बारामती येथे २ आणि ३ मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या नमो महारोजगार मेळाव्यात मोठा झोल असल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. या मेळाव्यातून ४३ हजार तरुणांना रोजगार मिळेल, असे सरकारकडून सांगितले जात असले, तरी यातील ३० हजार पदे ही ट्रेनी असून प्रत्यक्षात नोकऱ्या नाहीत. या मेळाव्याची जबाबदारी प्लेसमेंट एजन्सीवर देण्यात आली आहे. त्यामुळे खासगी कंपन्यांमधील रोजगारामध्ये बाह्य यंत्रणेचा शिरकाव सरकारच्या कृपेने झाला असून बेरोजगार तरुणांच्या भावनांशी सरकार खेळत असल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे.

पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील नोकरीची संधी शोधणाऱ्या युवकांसाठी बारामतीमध्ये नमो महारोजगार मेळावा भरविण्यात आला आहे. या मेळाव्यात तब्बल ४३ हजार ...