Nagpur, मार्च 19 -- सोमवारी रात्री झालेल्या हिंसाचारानंतर नागपुरातील परिस्थिती नियंत्रणात असली तरी शहरातील अनेक संवेदनशील भागात संचारबंदी कायम आहे. दरम्यान, नागपूर पोलिसांनी बुधवारी फहीम शमीम खानचा पहिला फोटो जारी केला आहे. फहीम हा १७ मार्च रोजी शहरात झालेल्या जातीय हिंसाचाराचा सूत्रधार असल्याचे सांगितले जाते. या हिंसाचारात अनेक जण जखमी झाले आहेत.

फहीम खान हा एमडीपीचा शहराध्यक्ष असून नागपुरातील यशोधरा नगरमधील संजय बाग कॉलनीत राहतो. जातीय दंगलीप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये त्यांचे नाव अधिकृतपणे समाविष्ट करण्यात आले आहे. संघर्ष सुरू होण्यापूर्वी फहीम खानने प्रक्षोभक भाषण केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यांच्या भाषणामुळे परिसरात जातीय तणाव निर्माण झाला आणि हिंसाचार उसळला, असा दावा पोलिस अधिकाऱ्यांनी केला आहे.

गडकरीयांच्...