Mumbai, फेब्रुवारी 13 -- Nagpur Lifetime Panipuri News: नागपूर येथील एका पाणीपुरीवाल्याने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले. या पाणीपुरी विक्रेत्याने आपल्या ग्राहकांसाठी आगळीवेगळी ऑफर आणली आहे, ज्याची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. ही ऑफर अंतर्गत ग्राहकांना अनलिमिटेड पाणीपुरी खायला मिळणार आहे. पण त्यासाठी ग्राहकांना एकदाच ९९ हजार रुपये भरावे लागणार आहे. अनेकजण या पाणीपुरीवाल्याच्या मार्केटींग आयडियाचे कौतूक करत आहेत.

नागपूर येथील तिसऱ्या पिढीतील पाणीपुरी विक्रेते विजय मेवालाल गुप्ता यांनी लोकप्रिय स्ट्रीट स्नॅक विकण्यासाठी ही अनोखी ऑफर आणली आहे, ज्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. अनलिमिटेड पाणीपुरी खाण्यासाठी ग्राहकाला एकरकमी ९९ हजार रुपये द्यावे लागणार आहे. यासाठी विक्रेता आणि ग्राहक यांच्यात कायदेशीर करार केला जाईल, असेही सांगितले ...