भारत, एप्रिल 29 -- Nagpur Timki murder : नागपूरच्या टिमकी परिसरात दारू पिऊन आईला शिवीगाळ करणाऱ्या भावाला विरोध केल्याने एका मोठ्या भावाने सख्ख्या लहान भावाची चाकूने भोसकून हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. किरकोळ वादातून झालेल्या या प्रकारामुळे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे.

गौरव उर्फ गुड्डू सुरेश गोखे (३५, टिमकी) असे हत्या झालेल्या भावाचे नाव आहे. तर दिलीप सुरेश गोखे (५१, टिमकी) असे आरोपी मोठ्या भावाचे नाव आहे. दोघेही एकाच घरात वर खाली राहत होते. दिलीपला दारूचे व्यसन असल्याने दिलीपची बायको त्याला सोडून गेली आहे. ही घटना रविवारी रात्री घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गौरव उर्फ गुड्डू सुरेश गोखे व दिलीप सुरेश गोखे हे दोघेही भावंड आहेत. ते एकाच घरात राहत होते. दिलीपला दारूचे व्यसन असल्याने त्याची बायको त्याला सोडून गेली आहे. दिलीप हा त्याच्...