Nagpur, फेब्रुवारी 3 -- नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने आपल्या मित्राचाटीशर्टचे ३०० रुपये दिले नाहीत म्हणून खून केला. ३००रुपयावरून दोन मित्रात वाद झाला त्यानंतर एकाने आपल्या भावाच्या मदतीने दुसऱ्या मित्राचा धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केली. या घटनेने शहरात खळबळ माजली आहे. पोलिसांनी गुन्हा नोंद करत दोन्ही आरोपी भावांना अटक केली आहे.

३०० रुपयांच्या टी-शर्टच्या वादातून दोन तरुणांनी मित्राची हत्या केल्याच्या घटनेने नागपूर हादरले आहे. शुभम हरणे (वय २९, रामसुमेरबाबानगर) असे मृताचे नाव आहे, तर प्रयाग आस्वले व अक्षय ऊर्फ लख्खा आस्वले असोले हे आरोपी आहेत. कावरापेठ परिसरातील एका बारसमोर ही हत्या करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, शांती नगर भागात रविवारी ही घटना घडली. शुभम हरणे याने आरोपी अक्षय आसोळे याला ३०० रुपये दे...