Nagpur, एप्रिल 28 -- Nagpur Accident News: नागपूर (Nagpur) जिल्ह्यात कळमेश्वर पोलिस ठाण्याच्या (Kalameshwar Police Station) हद्दीत शु्क्रवारी कार नदीत कोसळल्याने भीषण अपघात घडला. कळमेश्वर येथील रथयात्रा व मिरवणूक बघण्यासाठी गेलेल्या वडिलांना घरी परत आणताना बाप- लेकावर काळाने घाला (Father and son dies) घातला. तर, एकजण जखमी झाला. जखमीवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळलेल्या माहितीनुसार, भय्याजी टाले (वय, ६५) आणि त्यांचा मुलगा रवींद्र टाले (वय,३५) अशी मृतांची नावे आहेत. भय्याजी शुक्रवारी कळमेश्वर येथील रथयात्रा व मिरवणूक बघण्यासाठी गेले होते. मात्र, उशीर होऊनही ते घरी न परतल्याने रवींद्र आणि राहुल डोमके (वय, ३५) हे दोघेही कार घेऊन कळमेश्वरला पोहोचले. यानंतर पहाटे भय्याजी यांना घेऊन तोंडखैरीच्या दि...