Mumbai, फेब्रुवारी 9 -- Nagpur News: नागपूर हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खळबळजनक घटना घडली. एका तरुणाने विवाहित प्रेयसीची हत्या करून तिच्या मृतदेहावर बलात्कार केला. याप्रकरणी पोलिसांनी तरुणाला अटक केली. महिलेने संबंधास नकार दिल्याने तरुणाने महिलेची हत्या केली. महिलेची मुलगी शाळेतून घरी परतल्यानंतर हे अमानवीय कृत्य उघडकीस आले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

रोहित गणेश टेकाम असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर, मृत महिला ही मूळची मध्य प्रदेशातील असून कामाच्या शोधात सहा वर्षांपूर्वी पतीसह नागपुरात आली. महिलेचा पती एका ढाब्यावर काम करतो. तो सकाळी घराबाहेर पडल्यानंतर मध्यरात्री एक वाजताच परत येतो. आरोपी आणि महिलेची दोन वर्षांपूर्वी हुडकेश्वर खुर्द येथील एका इमारतीच्या बांधकामादरम्यान ओळख झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये प्रेम...