Mumbai, फेब्रुवारी 12 -- Hybrid Mutual Fund : शेअर बाजारात व अन्य प्रकारच्या मालमत्तांमध्ये गुंतवणूक करण्याचा म्युच्युअल फंड हा अलीकडचा सर्वात लोकप्रिय पर्याय आहे. म्युच्युअल फंडांतील गुंतवणूक सातत्यानं वाढत आहे. म्युच्युअल फंडांचेही अनेक वेगवेगळे प्रकार आहेत. त्या प्रकारांचेही अनेक पोटप्रकार आहेत.

हायब्रीड फंड हा असाच म्युच्युअल फंडाचा लोकप्रिय उपप्रकार आहे. या फंडाच्या माध्यमातून एकापेक्षा जास्त मालमत्ता श्रेणीत (Asset Class) गुंतवणूक करता येते. हे फंड इक्विटी आणि डेट फंडाचं मिश्रण असतात. काही वेळा सोने किंवा अगदी रिअल इस्टेट सारख्या क्षेत्रांतही या फंडाच्या माध्यमातून गुंतवणूक केली जाते.

> हायब्रिड फंड गुंतवणूकदारांना त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणण्यास मदत करतात.

> बाजारातील जोखीम नियंत्रित करण्यात मदत करू शकतात आणि तुलनेनं स...