Mumbai, मे 25 -- Mumbai Water Cut news : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. पश्चिम उपनगरातील काही भागात दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. २७ व २८ मे रोजी पी उत्तर, आर दक्षिण आणि आर मध्य विभागातील काही भागात पाणी पुरवठा होणार असल्याने नागरिकांनी पाणी जपून वपरण्याचे आवाहन पालिकेच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. येथील जीर्ण झालेल्या जलवाहिनी बदलण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे. त्यामुळे दोन दिवस हा पाणी पुरवठा बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे एक दिवस पाणी पुरेल असा साठा करून ठेवावा असे आवाहन करण्यात आले आहे.

पालिकेने दिलेल्या माहितीनुसार मालाड पश्चिम भागातील पाणी पुरवठ्यात कायमस्वरूपी सुधारणा करण्याच्या हेतूने पी उत्तर विभागातील मार्वे मार्गावरील ९०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी ही बदलण्यात येणार आहे. ही जलवाहिनी जीर्ण झाली असून वारंवार फुटत असल्...