Mumbai, मे 23 -- Mumbai Lake Levels Drops: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमधील पाण्याची पातळी १०.६७ टक्क्यांपर्यंत घसरली आहे, मागील दोन वर्षांच्या तुलनेत सर्वात कमी आहे. राज्य सरकारने भातसा आणि अप्पर वैतरणा तलावातून अतिरिक्त पाणीसाठा दिला असला तरी तलावांची पातळी खालावल्याने नागरी अधिकारी चिंतेत आहेत. मात्र, सद्यस्थितीत पाणीकपातीचे कोणतेही नियोजन नसून परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाईल, असे महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे. यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Weather Updates: मध्य महाराष्ट्र, विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा; या जिल्ह्यांत वादळी पावसाची शक्यता

महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेतला. नागरी अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, "आम्ही भातसा आणि अप्पर वैतर...