Mumbai, एप्रिल 30 -- Mumbai Train Accident : मुंबईची लाईफ लाइन समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनच्या गर्दीने गेल्या दोन दिवसांत दोघांचा बळी घेतला आहे. यात एका तरुणाचा आणि तरुणीचा समावेश आहे. लोकलमध्ये असलेल्या गर्दीमुळे दोघेही दरवाज्यात लटकून प्रवास करत होते. मात्र, त्यांचा तोल गेल्याने खाली पडून त्यांचा मृत्यू झाला. मृत दोघेही डोंबिवली येथील आहे. ही घटना डोंबिवली ते घाटकोपर आणि दिवा ते मुंब्रा या रेल्वे स्टेशनच्या दरम्यान घडली.

मुंबईतल्या लोकल ट्रेनच्या गर्दीने दोन जणांचा जीव घेतला आहे. दरवाज्यातून पडून दोन दिवसांमध्ये दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये एक तरुण आणि एका तरुणीचा समावेश आहे. डोंबिवली ते कोपर आणि दिवा ते मुंब्रा या रेल्वे स्टेशनच्या दरम्यान हे दोन्ही अपघात घडलेले आहेत. ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी असल्यामुळे ...