Mumbai, फेब्रुवारी 2 -- Mumbai police : मुंबईत तब्बल सहा ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आला असून मोठा धमाका होणार आहे असा धमकीवजा मेसेज मुंबई पोलिसांना आल्याने खळबळ उडाली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांना हा मेसेज आला आहे. या पूर्वी बुधवारी देखील असाच मेसेज आला होता. दरम्यान, या धमकीमुळे पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल असून त्याचा शोध घेतला जात आहे.

मुंबईत गेल्या काही दिवसांपासूंन धमकीचे मेसेजेस येण्याचे प्रमाण वाढले आहे. यातुन घातपात करण्याच्या धमक्या देण्यात येतात. आज देखील मुंबई वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षाला एका अज्ञात व्यक्तीने धमकीचा मेसेज पाठवला असून मुंबईत सहा ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आला असून मोठा धमाका होणार असल्याचे त्याने मेसेजमध्ये म्हटले आहे. ही माहिती वाहतूक पोलिसांनी मुंबई पोलिसांना दि...