Mumbai, फेब्रुवारी 7 -- Mumbai Girl Suicide News: मुंबईतील माहिम परिसरात भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या एका २६ वर्षीय तरुणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली. हे टोकाचे पाऊल उचलण्याआधी तरुणीने एक व्हिडिओ रेकॉर्ड केला, ज्यात तिने आत्महत्येस प्रियकराला जबाबदार धरले. यानंतर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी मृत तरुणीच्या प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. मात्र, या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

एएनआय वृत्तसंस्थेने मुंबई पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील माहीम परिसरात राहणाऱ्या एका तरुणीने आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी तरुणीने व्हिडिओ बनवत आपल्या प्रियकरावर गंभीर आरोप केले आहेत. तरुणीच्या प्रियकराने तिला दोनवेळा गर्भवती केले. परंतु, नंतर त्याने तिच्याशी लग्न कर...