Mumbai, फेब्रुवारी 6 -- Mumbai Suicide News: मुंबईतील चुनाभट्टी- सायन परिसरात राहणाऱ्या २९ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली. औषधोपचार करून आजारपण बरे होत नसल्याने संबंधित तरुणाने आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलले. ही घटना सोमवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. मात्र, या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

आशिष विरशेट्टी हट्टे असे आत्महत्या केलेल्या २९ वर्षीय तरुणाचे नाव असून तो चुनाभट्टी- सायन येथील म्हाडा कॉलनीतील श्रीरंग सोसायटीमध्ये राहायला होता. मिळालेल्या माहितीनुसार, आशिष हा दिर्घकाळापासून आजारी होता. औषधोपचार करुनही आजार बरा होत नसल्याने तो मानसिक तणावात होता. अखेर सोमवारी सकाळी ८.३० वाजताच्या सु...