Mumbai, फेब्रुवारी 3 -- Mumbai Rape News: मुंबईतील वांद्रे टर्मिनस येथे लांब पल्ल्याच्या रेल्वेच्या रिकाम्या डब्यात एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी एका हमालाला अटक करण्यात आली. ही घटना शनिवारी (१ फेब्रुवारी) रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. मात्र, या घटनेने लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

एका पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मध्यमवयीन महिला आणि तिचा मुलगा शनिवारी रात्री हरिद्वारहून वांद्रे टर्मिनस येथे उतरले. मुलगा काही कामानिमित्त स्थानकाबाहेर गेला. त्यावेळी पीडित महिला थोडा वेळ प्लॅटफॉर्मवर झोपली. मात्र, झोपेवर नियंत्रण मिळवता न आल्याने ही महिला समोर उभ्या असलेल्या एका एक्स्प्रेस ट्रेनच्या रिकाम्या डब्यात जाऊन झोपली. त्याठिकाणी काम करत असलेल्या आरोपी हमालाने तिला पाहिले. महिला एकटीच असल्याचा आण...