Mumbai, जानेवारी 30 -- Mumbai News: मुंबईत आई-मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली. निर्मलनगर भागात मित्रासह पोटच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी निर्मल नगर पोलिसांनी पीडिताच्या आईला अटक करण्यात आली असून तिच्या मित्राला लवकरच बेड्या ठोकल्या जातील, असे अश्वासन पोलिसांनी दिले. मात्र, या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या महिलेवर तिच्या १५ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यास मदत केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या मित्राने २०२२ ते २०२५ या कालावधीत अल्पवयीन मुलीवर अनेकदा बलात्कार केला. अल्पवयीन मुलीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, डिसेंबर २०२४ ते ८ जानेवारी २०२५ या कालावधीत तिच्या आईने मित्रासोबत व्हिडिओ कॉलवर बोलताना अनेकवेळा ...