Mumbai, नोव्हेंबर 29 -- Mumbai Metro Timings: मुंबईतील घाटकोपर-वर्सोवा मेट्रो मार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी खूशखबर आहे. या मार्गावरील मेट्रो सेवेची वेळ एक तासानं वाढवण्यात आली आहे. म्हणजेच, पहिली गाडी आता एक तास लवकर सुटणार आहे. नव्या वेळापत्रकानुसार, आता पहिली मेट्रो गाडी सकाळी ५.३० मिनिटांनी सुटणार आहे.

मेट्रोची पहिली गाडी लवकर सोडण्यात यावी अशी मागणी प्रवाशांकडून केली जात होती. त्याची दखल घेऊन 'मेट्रो वन'नं हा निर्णय घेतला आहे. काल, २८ नोव्हेंबर पासून नव्या वेळापत्रकाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यानुसार, पहिली ट्रेन वर्सोवा आणि घाटकोपर स्थानकातून एकाच वेळी सकाळी साडेपाच वाटता सुटणार आहे. तर, शेवटची ट्रेन वर्सोवा स्थानकातून रात्री ११.२० वाजता तर घाटकोपर स्थानकातून ११.४५ वाजता सुटणार आहे. मुंबई मेट्रो वन कंपनीनं ट्वीटच्या माध्यमातून...