Mumbai, फेब्रुवारी 4 -- Central Railway News : मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्यामुळं मुंबईतील लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. तासाभरानंतर बिघाड दुरुस्त करण्यात आला असला तरी या मार्गावरील गाड्या उशिरानं धावत आहेत.ठाणे जिल्ह्यातील दिवा ते मुंब्रा रेल्वे स्थानकांदरम्यान पहाटे पावणेचार वाजता सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. त्याचा फटका लोकल सेवेला बसला. उपनगरीय गाड्या किमान १५ ते २० मिनिटे उशिरानं धावत होत्या.मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. बिघाड झाल्यानंतर तासाभरानंतर सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सिग्नल बसविण्यात आला. त्यानंतर लोकल सेवा सुरळीत झाली, असं त्यांनी सांगितलं.

हेही वाचा: पुणेकरांची कोंडी सोडवण्यासाठी महापालिकेचा मास्टर प्लॅन! ३० मिसिंग लिंकसह ९...