Mumbai, जानेवारी 26 -- Mumbai Local News: कर्नाक पुलावर गर्डर बसवण्यासाठी रेल्वकडून रात्रीचा मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला. परंतु, काम अद्यापही न संपल्याने मुंबईची लाईफलाइन म्हटली जाणारी लोकलसेवा विस्कळीत झाली आहे. मेगाब्लॉकमुळे मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक खोळंबलेली असून पश्चिम रेल्वेची वाहतूक उशीराने सुरू आहे. एवढेच नव्हेतर, लोकलसह लांब पल्ल्याच्या गाड्या दादर, भायखळा आणि वडाळा इथपर्यंत धावत आहेत. त्यामुळे दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना रिक्षा किंवा बसने प्रवास करावा लागत आहे.

कर्नाक पुलावर गर्डर बसवण्यासाठी रात्रीचा मेगाब्लॉक घेण्यात आला होता, जो आज पहाटे ५.३० वाजेपर्यंत सुरू असेल, असे रेल्वेकडून सांगण्यात आले होते. मात्र, गर्डर बसवण्याचे काम अद्यापही पूर्ण न झाल्याने तिन्ही मार्गावर वाहतूक विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्व...