Mumbai, फेब्रुवारी 11 -- Mumbai local : मुंबईत कल्याणकडे जाणाऱ्या लोकलच्या महिलांच्या डब्यात एका महिलेच्या पर्समधील मोबाइलचा अचानक स्फोट झाला. या घटनेमुळे डब्यात आग लागून धूर पसरला. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये गोंधळाचं व भीतीचं वातावरण पसरलं होतं. ही घटना सोमवारी कळवा स्थानकात रात्री ८.३० च्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी कल्याण येथे जाणाऱ्या लोकलच्या डब्यात एका महिलेच्या पर्समधील मोबाइलचा स्फोट झाला. अचानक स्फोट झाल्याने तसेच महिलेच्या पर्समधून धूर येऊ लागण्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली. काही प्रवाशांनी आरडा ओरडा केला. ही रेल्वे काही वेळात कळवा स्थानकात आली. यावेळी मोटरमनच्या केबिनमधील गार्डने प्रसंगावधान राखत तातडीने अग्निरोधकाच्या सहाय्याने आग विझवली. यामुळे मोठी दुर्घटना टळली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. ही...