भारत, एप्रिल 28 -- Mumbai Fire: मुंबईच्या कांदिवली येथील एका खाजगी रुग्णालयाला शनिवारी (२८ एप्रिल २०२४) आग लागल्याची घटना घडली. या आगीत ४ जण होरपळल्याची माहिती समोर येत असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. ही आग कशामुळे लागली, हे अद्याप अस्पष्ट नसून स्थानिक पोलिसांनी याप्रकरणी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

मुंबई अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, कांदिवली पश्चिम येथील आशिष केसर इमारतीतील विन्स रुग्णालयात दुपारी दोन वाजताच्या सुमारास आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. स्वाधीन मुखी (वय, ५६), राजीव (वय, ३५), नरेंद्र मुर्या (वय, ४५), सुनील (वय, ३५) अशी जखमींची नावे आहे. सर्व जखमींना बोरिवली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. अग्निशमन नियंत्रण कक्...