Mumbai, मे 14 -- Ghatkopar Hording collapse : मुंबईमध्ये सोमवारी पावसाने आणि वादळी वाऱ्याने भीषण थैमान घातले. या वादळी वाऱ्याचा मोठा फटका मुंबईकरांना बसला. वादळी वाऱ्यामुळे घाटकोपर परिसरात असलेल्या पेट्रोल पंपावर मोठे होर्डिंग कोसळले. या घटनेत सोमवार पर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला होता. मात्र, या दुर्दैवी घटनेतील मृतांचा आकडा वाढला आहे. मृतांची संख्या ही १४ वर पोहोचलि आहे. या ठिकाणी अजूनही बचावकार्य सुरू आहेत.

होर्डिंग खाली तब्बल १०० जण अडकले होते. आता पर्यंत या घटनेत जखमींचा आकडा हा ६० वरुण ८७ वर पोहोचला आहे. सर्व जखमींना उपचारासाठी राजावाडी रुग्णालय, एच बी टी रूग्णालय, एम जे फुले रुग्णालय आणि प्रकृती रुग्णालयात दाखल केले आहे. या जखमींपैकी १४ जणांचा मृत्यू तर ४२ जणांवर उपचार सुरू आहेत. ३१ नागरिकांना प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले आहे...