Mumbai, फेब्रुवारी 11 -- Mumbai Oshivra Fire: मुंबई येथील ओशीवराय येथे असलेल्या फर्निचर मार्केटला भीषण आग लागली आहे. या आगीत तब्बल १२ सिलेंडरचा स्फोट झाला आहे. या आगीत तब्बल २० ते २५ दुकाने भस्मसात झाली आहे. अग्निशामक दलाच्या काही गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. ही आग एवढी भीषण आहे की दूरवरून आगीचे लोट दिसून येत होते. या घटनेत कुणी जखमी वा मृत्युमुखी पडल्याची अद्याप माहिती नाही. स्थानिक नागरिक व अग्निशामक दलाचे कर्मचारी बचावकार्य राबवत आहेत.

मुंबईतील ओशिवरा येथील फर्निचर मार्केटला मोठी आग लागली आहे. ही आग दुपारी १२ च्या सुमारास लागली. ही आग नेमकी कशी लागली याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी अशी शक्यता वर्तवली जात आहे. अंधेरी पश्चिमेकडील जोगेश्वरी ओशिवरा येथे मोठे फर्निचर...