भारत, एप्रिल 27 -- मीरा रोड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे राहणाऱ्या २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार करून तिच्यावर धर्म परिवर्तनासाठी दबाव टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपींनी पीडितेची अश्लील छायाचित्रे काढून तिच्याकडून लाखो रुपये उकळण्यात आल्याचा प्रकारही समोर आला आहे. त्यानंतर आरोपींनी तिचे केस काढून तिला विद्रुप केले होते. याप्रकरणी नया नगर पोलिसांनी ६ जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडिता २६ वर्षाची असून ती मीरा रोड परिसरात राहते. गेल्यावर्षी ऑक्टोबर २०२३ मध्ये तिची ओळख कल्याणमधील मोहसीन शेख या२२ वर्षीय तरुणाशी झाली. तिने नया नगर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार मोहसीन याने पीडितेला बिर्याणीत गुंगीचे औषध घालून तिला खायला दिली होती. ही बिर्याणी खाल्ल्यानंतर पीडित तरुणी बेशुद्ध झाली ...