Mumbai, जानेवारी 27 -- Mumbai Couple Suicide on Railway Track: मुंबईतील विक्रोळी परिसरात ही थरकाप उडवणारी घटना घडली आहे. घरच्यांनी लग्नाला नकार दिला म्हणून प्रेमीयुगुलाने धावत्या एक्स्प्रेससमोर उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेतील मुलगी अल्पवयीन आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रविवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेतील तरुणाचे वय १९ आहे. तर, मुलगी १५ वर्षांची आहे. तरुण महाराष्ट्रातील आहे. तर, मुलगी परप्रांतीय असल्याची माहिती समोर आली आहे. दोघेही मुंबईतील भांडुप परिसरातील हनुमानगर येथे वास्तव्यास होते. दोघांचे एकमेकांवर प्रेम असून त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला होता. मात्र, घरच्यांनी त्यांच्या लग्नाला विरोध दर्शवला. यामुळे निराश झालेल्या प्रेमीयुगुलाने एकसोबत आत्महत्यासारखा टोकाचा निर्णय घे...