Mumbai, फेब्रुवारी 14 -- Mumbai BEST Price Hike: मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. लोकल नंतर बेस्ट बस प्रवासाचे प्रमुख साधन आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून बेस्ट सेवा तोट्यात असल्याने बेस्टच्या तिकिट दरात वाढ करण्यात आली आहे. ही वाढ दुप्पट केली जाणार आहे. नव्या दरानुसार बेस्ट बसचे भाडे हे ५ रुपयांवरून १० रुपये तर एसी बसचे भाडे हे ६ वरून १२ रुपये करावा असा प्रस्ताव देण्यात आला आहे.

बेस्ट बस सेवा ही मुंबईतील प्रमुख सेवा आहे. बेस्टमधून रोज लाखो मुंबईकर प्रवास करतात. बेस्टच्या महाव्यवस्थापकपदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे सीईओ एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी गुरुवारी बेस्ट अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी त्यांनी भाडेवाढ व बेस्टमधील बसचा ताफा या बाबत माहिती घेतली.

यावेळी बेस्टचा तोटा भरून काढण्यासाठी भाडेवा...