Mumbai, फेब्रुवारी 8 -- Mumbai Accident News: अंत्यविधीतून परत असताना एका तरुणावर काळाने घाला घातला. आपल्या पुतण्यासह घरी येत असताना मुंबईतील दिंडोशी उड्डाणपुलावर भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत तरुण गंभीर जखमी झाला. त्याला ताबडतोब जवळील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आधीच घरातील एका महिलेच्या निधनाने शोकाकुळ झालेल्या कुटुंबाला आणखी एका सदस्याला गमवावे लागल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

रमेश जोरे (वय ३६) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून तो घाटकोपर येथील मंगलमूर्ती सोसायटीत राहायला होता. बहिणीचा अंत्यविधी आटोपून मृत रमेश हा त्याचा पुतण्या नरेश (वय, १८) याच्यासह आपल्या सुझुकी बर्गमन दुचाकीने घरी परत येत होता. मात्र, पश्चिम द्रुतगती महामार्गावरील दिंडोशी उड्डाणपुलावर एका भरध...