Mumbai, फेब्रुवारी 4 -- Mumbai Class 4 Girl Injection News: देशाची राजधानी मुंबई येथून पालकांच्या चिंतेत भर घालणारी माहिती समोर आली. एका अज्ञात व्यक्तीने शाळेत घुसून इयत्ता चौथी शिकणाऱ्या मुलीला कुठले तरी इंजेक्शन टोचले आणि पळून गेल्याची घटना घडली, अशी तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली. या घटनेने शाळा प्रशासनामध्ये एकच खळबळ माजली. पोलीस अज्ञात व्यक्तीचा शोध घेत आहे.

चौथीच्या वर्गातील मुलीने असा दावा केला आहे की, एका अज्ञात व्यक्तीने शाळेच्या आवारात प्रवेश करून तिला कुठले तरी इंजेक्शन टोचले आणि घटनास्थळावरून पळून गेला. यानंतर मुलीला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले. मुलीची प्रकृती ठिक असल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी मुलीच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दिली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली. या घटनेमुळे शाळे...