Mumbai, फेब्रुवारी 9 -- Mumbai Govandi News: मुंबईतील गोवंडी येथील रफिक नगर भागातून बेपत्ता झालेल्या तीन वर्षांच्या मुलीचा मृतदेह ४८ तासांनंतर तिच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या नाल्यात आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन मुलीचा मृतदेह बाहेर काढला. तसेच या मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रग्णालयात पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदनाच्या अहवालानंतर अनेक गोष्टी स्पष्ट होतील, असे पोलिसांनी म्हटले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आयेशा नेहल खान असे नाल्यात मृतदेह आढळलेल्या मुलीचे नाव आहे. आयेशा ही आपल्या आई-वडिलांसह गोवंडी येथील रफिक नगर परिसरात राहत होती. आयेशाच्या आजीने दिलेल्या फिर्यादीनुसार, आयेशाच्या आईने १० दिवसांपूर्वी एका बाळाला जन्म दिला आहे आणि ती अंथरुणातच आहे. दरम्यान, ६ फेब्र...